Hailstorm Alert: नमस्कार शेतकरी मित्रांनो आज 28 एप्रिल पासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली तर काही भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवलेत आले आलेला आहे.
मग कोणत्या भागामध्ये उष्णतेची लाट आणि कोणत्या भागामध्ये वादळी पाऊस पाहूयात मित्रांनो याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड तसेच अकोला अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे.
कोणत्या भागात कसे असेल हवामान?
तर यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच बुधवारी सुद्धा विदर्भामध्ये वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज आहे.
तसेच मराठवाड्यातील सोलापूर, धाराशीव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तसेच गुरुवारी, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.
राज्याच्या इतर भागात तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. तर मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
